पंतप्रधानांच्या हस्ते इंटरनेटविना चालणाऱ्या ‘भीम’ अॅपचे उद्घाटन


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील तालकतोरा मैदानात आज, शुक्रवारी डिजि धन मेळ्यात ‘भीम’ या मोबाईल अॅपचे उद्घाटन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी डिजिटल पेमेंट करणारे आणि लकी ग्राहक योजनेचे विजेते यांचे आभार मानले. त्याचबरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हे अॅप समर्पित असल्याचेही मोदींनी सांगितले. त्यांच्या भिमराव नावापासूनच या अॅपचे नामकरण केले असल्याची माहिती मोदींनी दिली.

डिजि धन मेळ्यात युवकांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांचे आभार मानले. सर्वसामान्यांना भीम या अॅपच्या माध्यमातून चांगले व्यासपीठ मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले. डिजिटल हे देशाच्या प्रगतीचे साधन आहे, असे सांगतानाच या योजनेला विरोध करणाऱ्यांना त्यांनी चिमटे काढले. यावेळी उपस्थितांनी ‘मोदी-मोदी’ अशी घोषणाबाजी केली. डिजिटल माध्यमातून सर्वसामान्यांची प्रगती आहे, असेही त्यांनी सांगितले. गरिबांचे धन गिळणाऱ्यांनाच बाहेर काढण्याचा हा प्रयत्न आहे, असे सांगत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

Leave a Comment