‘रेनकोट’च्या जनकाला गुगलचा सलाम


आपल्याला धो धो कोसळणा-या पावसात भिजण्यापासून रेनकोट वाचवतो. आपल्यापैकी अनेकांना तसा तो ओल्डफॅशन वगैरे वाटत असला तरी छत्रीला त्याची सर येणार नाही हेही तेवढेच खरे आहे. आज या रोनकोटचा शोध लावणा-या चार्ल्स मॅकिन्टॉशची २५० वी जयंती असल्यामुळे गुगलने खास गुगल डुडल बनवून चार्ल्सला मानवंदना दिली आहे.

पावसात रेनकोट घालून भिजणारा एक व्यक्ती आज गुगल उघडल्यावरच दिसेल. ही तिच व्यक्ती आहे ज्याने रेनकोटचा शोध लावला. चार्ल्स मॅकिन्टॉशची आज २५० वी जयंती आहे आणि त्याला आदरांजली वाहण्यासाठी गुगलने खास डुडल बनवले आहे. त्यांचा जन्म स्कॉटलंडमधील ग्लासगोव्हमध्ये झाला. रसायनशास्त्रात चार्ल्स यांना फारच रुची होती. वेगवेगळे प्रयोग करण्यात ते नेहमीच व्यस्त असायचे. नाफ्ता हा रबरमध्ये सहजासहजी विरघळतो. यापासून एक पदार्थ तयार होतो जो जलरोधक असतो हे चार्ल्स यांना एका प्रयोगादरम्यान कळले. त्यांनी दोन कपड्यांच्यामध्ये हे मिश्रण लावले हा कपडा पाण्यात भिजला तरी त्यातून पाणी आत झिरपणार नाही हे चार्ल्स यांना कळले. जलरोधक कापड बनवण्याचे पेटंट त्यांना १८२३ मध्ये मिळाले. पण त्याकाळात त्यांच्यावर आरोपही झाले हा शोध खरं तर त्यांचा नसून सर्जन जेम्स सिम यांच्याकडून त्याने ही कल्पना घेतली असेही आरोप झाले.

Leave a Comment