भारतातील नोटबंदीमुळे दुबईचा गोल्ड बाजार झाकोळला


दुबईतील गोल्ड बाजारावर भारतातील नोटबंदीचा चांगलाच परिणाम झाला असल्याचे दुबई गोल्ड अॅन्ड ज्युवेलर्स बोर्डाचे सदस्य अब्दुल सलेम यांनी सांगितले. भारतात ८ नोव्हेंबरला चलनातून मोठ्या रकमेच्या नोटा रद्द करण्यात आल्यानंतर दुबईतील सोने बाजारावर त्याचा चांगलाच विपरित परिणाम झाला असून सोने खरेदी एकदमच मंदावली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दुबईतील सोने बाजारात खरेदी करणार्‍यात भारतीयांचे प्रमाण लक्षणीय आहे. येथील एकूण विक्रीच्या १५ ते २० टक्के विक्री भारतीय चलनात केली जाते. मात्र नोटबंदीमुळे दुबईला येणारे भारतीय पर्यटक सोने खरेदीपासून लंाब रहात आहेत. आजपर्यंत दुबईत येताना भारतीय मोठी रोकड बरोबर घेऊन येत असत व ही रोकड सोने दागिन्यात बदलली जात असे. नोटबंदी मुळे भारतीयांजवळ कॅश पैसा कमी झाला आहे त्यामुळे सोने खरेदी मंदावली आहे. चीनी पर्यटकांनी यावर थोडाफार दिलासा दिला असला तरी चीनी १८ कॅरेट सोने खरेदीस प्राधान्य देतात व भारतीयांच्या तुलनेत त्यांची खरेदी नगण्य म्हणावी अशी असल्याचेही सलेम सांगत आहेत.

Leave a Comment