कुलपॅड लेइकोचा कुल वन ड्युल भारतात आला


कुलपॅडने त्यांचा नवा कुल वन ड्युल स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केला आहे. हा फोन कुलपॅड व लेईको या दोन कंपन्यांनी संयुक्तरित्या तयार केला असून दोन व्हेरिएंटमध्ये तो भारतात आला आहे. हा भारतातील सर्वात स्वस्त ड्युल बॅक कॅमेरा असलेला फोन असल्याचा कंपनीचा दावा आहे. सिल्व्हर आणि गोल्ड अशा दोन रंगात व १३९९९ रूपयांत तो भारतात मिळणार आहे.

या फोनसाठी ५.५ इंची फुल एचडी स्क्रिन आहे व तो अँड्राईड मार्शमेलो ६.० आधारित लेईको इयूआय ५.६ वर रन करतो. त्याला बॅकसाईडला १३ एमपीचे दोन कॅमेरे ड्युल टोन एलईडी फ्लॅशसह दिले गेले आहेत. यातील एक कॅमेरा कलर कॅप्चर करतो तर दुसरा डेप्थ, डिटेल्स व ब्राईटनेस कॅप्चर करतो. फ्रंट कॅमेरा ८ एमपीचा वाईल्ड अँगल लेन्ससह दिला गेला आहे. ४०६० एमएएच बॅटरी, बॅक पॅनलवर फिंगरप्रिट स्कॅनर, ३ व ४ जीबी रॅम असलेला हा फोन ३२ जीबी इंटरनल स्टोरेजसह आहे. ३ जीबीचा फोन ऑफलाईन स्टोअर्समध्ये मिळणार आहे तर ४ जीबी चा फोन ऑनलाईनवरच खरेदी करता येईल. या फोनची विक्री अॅमेझॉनवर ५ जानेवारीपासून सुरू होईल.

Leave a Comment