भारताची शस्त्रखरेदी


अमेरिकेसारखे देश कशावर श्रीमंत झाले आहेत ? भारत, पाकिस्तान, इस्रायल, श्रीलंका, इराण, इराक, सीरिया असे सारे विकसनशील देश सतत लढाया करीत राहतात आणि त्यासाठी परस्परांत तीव्र शस्त्रस्पर्धा करतात. त्यामुळे अमेरिका, फ्रान्स, रशिया, इटली या देेशांच्या शस्त्रास्त्रांना सतत मागणी येत राहते आणि ते श्रीमंत होतात. या सगळ्या वेड्या देशांनी परस्परांत लढायचे नाही आणि गांधीजींचा अहिंसेचा मंत्र आचरणात आणायचा असे ठरवले तर ही स्पर्धा कमी होईल आणि शस्त्रांच्या आयातीवर जगणारे तसेच श्रीमंत होणारे हे देश अक्षरश: भिकेला लागतील. अमेरिका श्रीमंत आहे पण तिच्या एकुण आर्थिक उलाढालीतली ३० टक्के उलाढाल केवळ शस्त्रांची निर्मिती आणि निर्यात यावर होत असते. म्हणून जगातले लहान लहान देश सतत लढत राहिले पाहिजेत अशी अमेरिकेची इच्छा असते.

अमेरिेकेचा सारा भर जगातल्या शस्त्रांच्या व्यापारावर असतो. या बाबत अमेरिकेच्या सरकारला सल्ला देणारी एक यंत्रणा आहे. तिला कॉंग्रेशनल रिसर्च सर्व्हिस असे तिचे नाव. जगभरातल्या विविध देशांनी किती शस्त्रे खरेदी केली, कोणाकडून केली आणि काय किंमतीला खरेदी केली याची सारी माहिती या सेवेतर्फे अमेरिकेच्या सरकारला दिली जात असते. ही माहिती उघड होत नाही. सेवेतर्फे ती जमा केली जाते आणि सरकारला पुरवली जाते. काही पत्रकारांनी ही माहिती मिळवली आहे. तिच्यातून जगातल्या शस्त्रस्पर्धेचे स्वरूप उघड झाले आहे. या माहितीनुसार अधिकाधिक शस्त्रे आयात करणार्‍या देशांत भारताचा दुसरा क्रमांक लागतो. या बाबतीत सौदी अरबस्तानचा क्रमांक पहिला आहे. हे क्रमांक काढताना या सेवेने २००८ ते २०१५ या काळातली त्या त्या देशांच्या शस्त्रांच्या आयातीची आकडे वारी संकलित करण्यात आली आहे.

या आयातीबाबत भारताचा क्रमांक दुसरा असला तरीही पहिल्या क्रमांकाच्या अरबस्तानच्या आणि दुसर्‍या क्रमांकावरच्या भारताच्या शस्त्रआयातीच्या आकड्यात मोठा फरक आहेे. भारताने या काळात ३४ अब्ज डॉलर्स एवढ्या रकमेची शस्त्रे मागविली. सौदी अरबस्तानने मात्र याच काळात ९८ अब्ज डॉलर्सची शस्त्र खरेदी परदेशांत केली आहे. या दोन देशातली शस्त्रांची खरेदी खरोखरच प्रचंड आहे. पण चीन शस्त्रांच्या संग्रहाबाबत जगात दुसर्‍या क्रमांकावर आहेे. चीनकडे शस्त्रे भरपूर आहेत पण ती त्यांनी आयात केलेली नाहीत तर ती स्वत: तयार केलेली आहेत. भारतालाही असे करता येणार नाही का ?

Leave a Comment