जिओनीचा भरभक्कम बॅटरीवाला एम २०१७ सादर


चीनी मोबाईल उत्पादक कंपनी जिओनीने त्यांचा नवा स्मार्टफोन चीनी बाजारात आणला आहे. एम २०१७ नावाने आलेल्या या फोनला ७ हजार एमएएच ची भक्कम बॅटरी क्विकचार्ज तंत्रज्ञानासह दिली गेली आहे. कंपनीच्या दाव्यानुसार या फोनमध्ये २५.८९ तासांचा व्हिडीओ प्ले बॅक टाईम मिळेल. काळा व गोल्ड या दोन रंगात सादर केल्या गेलेल्या या फोनची किंमत ६९९९ युआन म्हणजे ६९ हजार रूपये आहे. विशेष म्हणजे कंपनीने या फोनचे दुसरे व्हर्जनही आणले आहे त्याची किंमत १६९९९ युआन म्हणजे १ लाख ६६ हजार रूपये आहे. या फोनसाठी बॅककव्हरला इटालियन कस्टम अॅलीगेटर लेदरचा( सुसरीचे कातडे) वापर केला गेला आहे.

एम २०१७ला ५.७ इंची क्यूएचडी एमोलेड डिस्प्ले असून त्याच्या किनारी कर्व्ह आहेत. हा ड्युल सिम फोन असून त्याला बॅकसाईडला ड्युअल कॅमेरा दिला गेला आहे. बॅक साईडला १२ व १३ एमपीचे दोन कॅमेरे तर फ्रंट साईडला ८एमपीचा कॅमेरा व फिंगरप्रिंट सेन्सर आहे. दोन्ही बॅक कॅमेर्‍यांसाठी झूम सपोर्ट आहे. ६ जीबी रॅम, अँड्राईड मार्शमेलो ६.०, इंटरनल मेमरी १२८ जीबी अशी त्याची अन्य फिचर्स असून कनेक्टिव्हीटीसाठी फोरजी, वायफाय, ब्ल्यू टूथ, जीपीएस, यूएसबी सी टाईप पोर्ट अशी ऑप्शन्स आहे.

Leave a Comment