अफ्रिकेतील केनियात बनले विशाल हिंदूमंदिर


जगभरात भारतीय व्यवसाय नोकरी निमित्ताने राहिले असले तरी जेथे राहतील तेथे ते आपली संस्कृती व धर्म यांचे पालन करताना दिसतात. यामुळेच जेथे जेथे भारतीयांची वस्ती आहे त्या त्या देशांत हिंदू मंदिरे उभारली गेलेली पाहायला मिळतात. अफ्रिकेतील केनिया देशात असेच एक विशाल हिंदू मंदिर नुकतेच उभारले गेले असून नैरोबीच्या लंगाटा भागात हे मंदिर स्वामी नारायण संप्रदायाने बांधले आहे.

नऊ एकर परिसरात असलेल्या या मंदिरात प्राचीन भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते. या मंदिरात नुकताच प्राणप्रतिष्ठा सोहळा नऊ दिवस पार पडला. दोन वर्षे या मंदिराचे काम सुरू होते व त्यासाठी २०० कोटी रूपये खर्च केले गेले. या नरनारायण मंदिरात सोहळ्याच्या चौथ्या दिवशी अनेक देवदेवतांच्या प्रतिमा स्थापन केल्या गेल्या. ध्वजारोहण, आरती, पंचामृत अभिषेक पार पडल्यानंतर ठाकूरजींना महाप्रसाद केला गेला. ३० हजारांहून अधिक भाविक यावेळी उपस्थित होते.

Leave a Comment