१० हजाराच्या जुन्या नोटा बाळगल्यास ५० हजारांचा दंड?


नवी दिल्ली: भारतीय चलनातून एक हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा बाद केल्यावर त्या बदलून घेण्यासाठीही सरकारने जनतेला मुदत दिली होती. मात्र, एवढ्यावरच सरकार थांबणार नसून, यापूढे बंदी घालण्यात आलेल्या हजार, पाचशेच्या जुन्या नोटा सोबत बाळगल्यास कायदेशीर कावाईही केली जाणार आहे. ३० डिसेंबर नंतर जुन्या नोटांचे व्यवहार करणे तसेच, जुन्या नोटा सोबत बाळगणे हाही गुन्हा ठरणार आहे. हा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीस रकमेच्या पाचपट अधिक दंड म्हणजेच १० हजाराच्या नोटा तुमच्याकडे आढळल्या तर ५० हजारांचा दंड आकारला जाण्याची शक्यता आहे.

याबाबत एनडीटीव्हीने सुत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. केंद्र सरकार या वृत्तात या निर्णयाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी लवकरच एक अध्यादेश काढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शासनाच्या धोरणानुसार चलनातून बाद करण्यात आलेल्या सर्व नोटा ३० डिसेंबरनंतर व्यवहारातूनही बाद व्हाव्यात. तसेच, ज्या लोकांकडे अशा नोटा असतील त्यांनी त्या नोटा रिझर्व्ह बॅंकेत जमा करणे अपेक्षित आहे. नोटबंदी केल्यावर अद्यापही जुन्या नोटा चलनात असून त्या नोटांवर व्यवहारही होत आहेत. या व्यवहारांना चाप लावण्यासाठी सरकार हे पाऊल उचलण्याची शक्यता आहे.

Leave a Comment