सोने २५ हजारांवर येणार


स्थानिक बाजारात कांही काळासाठी तरी सोन्याचे दर २५ हजारांच्या पातळीवर उतरतील असे अंदाज या क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामागची कारणे अशी की सध्या ग्लोबल अथवा स्थानिक बाजारातही सोन्याबाबत फारसे सेंटीमेंट नाही.त्यातच यूएस फेडने व्याजदर वाढीचे संकेत दिले आहेत. नोटबंदीमुळे रोख रकमेची चणचण निर्माण झाली आहे व याचा थेट परिणाम सोन्याची मागणी कमी होण्यात झाला आहे. परिणामी सोने २५ हजारांवर येण्याची शक्यता आहे.

भारतात नोटबंदी झाली तेव्हा म्हणजे ८ नोव्हेंबरला सोन्याचे दर ३१७५० प्रति १० ग्रॅम होते ते आज तारखेला २७५५० वर आले आहेत. त्यात यापुढेही घसरण होईल कारण व्याजदर वाढीचे संकेत दिले जात आहेत. नोटबंदीनंतर सोन्याची मागणी ६० ते ७० टक्के घटली आहे. मागणीच नसेल तर दर वाढ होण्याचे कारणच नाही. अर्थात सोन्याचे दर २५हजारांवर आले तरी ते थोडाच काळ असतील. बाजारात पुरेशी रेाकड आली की ते २५ ते २९ हजार प्रति १० ग्रॅम या दरम्यान चढतउतरत राहतील असाही या तज्ञांचा अंदाज आहे. नोटबंदीमुळे चांदीचे दरही ४३८५० रूपयांवरून ३८६६० रूपये प्रति किलोवर घसरले आहेत.

Leave a Comment