नव्या वर्षात महागणार बजाजच्या बाईक


नवी दिल्ली: नवीन वर्षाच्या जानेवारीपासून बजाज आपल्या बाईकच्या दरात वाढ करण्याची शक्यता असून ही वाढीव किंमत साधारण १५०० रूपये ऐवढी असू शकते. ही दरवाढ उत्पादनखर्च वाढल्याने करण्यात येत असल्याचे कंपनीच्या सुत्रांनी म्हटले आहे.

बजाज ऑटो लिमिटेडचे अध्य़क्ष (मोटरसाईकल) इरिक व्यास यांनी संभाव्य दरवाढीबाबत बोलताना सांगितले की, येणाऱ्या वर्षातील एप्रिल महिन्यापासून देशात केवळ बीएस-४ स्टॅंडर्डवाल्या बाईकच विकण्यात येतील. त्यामुळे सर्व बाईक आम्ही अपग्रेड करत आहोत. तसेच आम्ही यात अव्वल बनन्याचा प्रयत्न करत आहोत, असेही व्यास यांनी म्हटले आहे. दरम्यान, बजाज आपल्या बाईकची किंमत साधारण ७०० रूपयांपासून ते १५००रूपयांच्या पटीत वाढवू शकते. दरम्यान या दरवाढीचा कोणताही परिणाम बजाजने नुकतीच लॉंच केलेली डोमिनर ४०० या बाईकवर होणार नसल्याचे समजते.

Leave a Comment