ऑनलाईन सुरक्षेबाबत जागृतीसाठी ‘डिजिटल सुरक्षित ग्राहक’ अभियान


नवी दिल्ली: ऑनलाईन व्यवहारांमध्ये लक्षणीय वाढ होत सल्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांमध्ये ऑनलाईन सुरक्षिततेबाबत जाणीव जागृती करण्यासाठी केंद्र सरकार आणि ‘गूगल’च्या संयुक्त विद्यमाने ‘डिजिटल सुरक्षित ग्राहक’ अभियान जानेवारी महिन्यापासून हाती घेण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत ग्राहकांना ऑनलाईन सुरक्षिततेबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईनचे सल्लागार आणि ग्राहक संरक्षण चळवळीत काम करणारे ५०० कार्यकर्ते यांना सुरक्षित ऑनलाईन व्यवहारांसंबंधी प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांनी हे प्रशिक्षण सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचवावे अशी अपेक्षा आहे. त्यासाठी ‘गूगल’च्या वतीने देशभर कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे.

नोटाबंदीनंतर ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन देण्यावर केंद्र शासनाचा भर आहे. त्यामुळे सर्वच क्षेत्रात ऑनलाईन व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाईन सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यासाठी केंद्राने गूगलच्या सहकार्याने हे अभियान हाती घेतले आहे.

Leave a Comment