२०१७ची सुरुवात आणि शेवट रविवारी


मुंबई – आगामी वर्षात शनिवार-रविवार मिळून एकूण १२० सुट्ट्‍या आल्या असून त्यातील ३८ सुट्ट्या वीकेंडला आहेत. १० वीकेंडमध्ये ३-३ दिवस आणि २ वीकेंडमध्ये ४-४ दिवस सुट्ट्या आल्या आहेत. विशेष म्हणजे रविवारपासून सुरु होणार्‍या नववर्षाचा शेवटही रविवारनेच होणार आहे.

सर्वाधिक सुट्‍ट्या २०१७ मध्ये एप्रिल, ऑगस्ट आणि ऑक्टोबर या ३ महिन्यांत आल्या आहेत. मे, जुलै, सप्टेंबर आणि नोव्हेंबरमध्ये शनिवार-रविवार व्यतिरिक्त कोणतीही शासकीय सुट्टी नाही. वर्षभरात ९ सुट्ट्या या शनिवार किंवा रविवारी आल्या आहेत. शासकीय दिनदर्शिकेनुसार आगामी वर्षात २९ पब्लिक हॉलिडे आणि २१ ऑप्शनल सुट्ट्या आहे. दरम्यान, राज्या-राज्यांच्या ऑप्शनल लीव्ह वेगवेगळ्या असू शकतात.

– जानेवारी महिन्यात १४ ला मकरसंक्रांति, १५ ला रविवार, २६ ला (गुरुवार) प्रजासत्ताक दिन, २८-२९ ला शनिवार, (चौथा) रविवार
– फेब्रुवारी महिन्यात २४ ला महाशिवरात्री, २५-२६ ला शनिवार, रविवार (सलग 3 सुट्ट्या)
– मार्च महिन्यात ११-१२ शनिवार, रविवार, १३ ‍ला धुलिवंदन, २५-२६ शनिवार, रविवार, २८ला गुढी पाडवा.
– एप्रिल महिन्यात १ ला बँक हॉलीडे, २ ला रविवार, ४ ला राम नवमी, १३ ला बैसाखी, १४ ला गुड फ्रायडे (आंबेडकर जयंती) १६ ला रविवार, याचप्रकारे २९, ३० ला वीकेंड
– मे महिन्यात १ ला महाराष्ट्र दिन, कामगार दिन,
– जून महिन्यात २४-२५ ला शनिवार आणि रविवार, २६ ला रमजान ईद
– जुलै महिन्यात शनिवार- रविवारसोडले तर एकही सुट्टी
– ऑगस्ट महिन्यात १२-१३ शनिवार- रविवार, १४ ला जन्माष्टमी, १५ स्वातंत्र्य दिन ( सलग 4 दिवस सुट्टी)
२५ ला गणेश चतुर्थी, २६-२७ शनिवार- रविवार
– सप्टेंबर महिन्यात शनिवार- रविवार सोडला तर एकही सुट्टी नाही.
– ऑक्टोबर महिन्यात १ ला रविवार, २ ला गांधी जयंती (सलग २ दिवस सुट्टी), १४-१५ शनिवार-रविवार, १७ ला धनत्रयोदशी, १८ ला नरक चतुर्दशी, १९ ला लक्ष्मीपूजन, २० ला बालप्रतिपदा, २१ला भाऊबीज, २८-२९ ला शनिवार-रविवार.
– नोव्हेंबर महिन्यात शनिवार-रविवार सोडले तर एकही सुट्टी नाही.
– डिसेंबर महिन्यात १ ला ईद-ए- मिलाद, २-३ ला शनिवार-रविवार (सलग 3 दिवस सुट्ट्या) २३-२४ ला शनिवार-रविवार, २५ ला ख्रिसमस (सलग ३ दिवस सुट्ट्या)

Leave a Comment