होंडाची न्यूव्ही कॉन्सेप्ट कार जाणेल मानवी भावना

newv
तंत्रज्ञान क्षेत्रात होत असलेले नित्यनवीन बदल स्वीकारण्यात ऑटोमोबिल उद्योगही अतिशय तप्तर होताना दिसून येत आहे. होंडा या कार उत्पादक कंपनीने अशी एक कन्सेप्ट कार तयार केली आहे जी माणसाच्या भावना जाणून घेऊ शकेल व त्यामुळे प्रवाशांना एक आगळावेगळा अनुभव घेता येईल. पुढच्या महिन्यात लासवेगास येथे होत असलेल्या कन्झुमर्स इलेक्ट्रीकल शोमध्ये ही कार सादर केली जात असून तिचे नामकरण न्यूव्ही असे केले गेले आहे.

या कारसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. यालाच इमोशन इंजिन्स असेही नाव आहे. हे तंत्रज्ञान माणसाच्या भावना जाणून घेऊ शकते. या निमित्ताने सिलीकॉन व्हॅली, डेट्राॅईट, जपान, जर्मनी येथील कार उत्पादक यांच्यातील अंतर वेगाने कमी होत असल्याचे तज्ञांचे मत आहे. ऑटो कंपन्या एवन, रोबोट व बिग डेटा या तंत्रज्ञानाचा वापर कौशल्याने करण्याकडे लक्ष पुरवित आहेत. होंडाची ही कार वजनाला हलकी व आकाराने लहान आहे. त्यामुळे पार्किंग समस्या व अतिगर्दीतून मार्ग काढणे अशा दोन्ही बाबी या कारमुळे सुकर होतील असा कंपनीचा दावा आहे.

Leave a Comment