हवेत लटकणारे जादूई नळ

nall1
कोणत्याही देशांतील बागबगिचे आकर्षक बनविण्यासाठी सुंदर हिरवळ, विशाल झाडे, मनमोहक फुले यांना जसे महत्त्व असते तसेच पर्यटकांना कुतुहल वाटेल, आकर्षण वाटेल अशा कांही करामतीही करण्यावर भर दिलेला असतो. मग कधी थुईथुई उडणारी, विविध छटा दाखविणारी कारंजी असतील कधी कृत्रिम धबधबे असतील तर कधी आणखी कांही. भारतातील उद्यानात आत्तापर्यंत कधी न पाहिले गेलेले हवेत लटकते जादूई नळ पाहायचे असतील तर मात्र अमेरिका, कॅनडा, बेल्जियम, स्पेन येथल्या कांही उद्यानांना भेट द्यावी लागेल. हे जादूई नळ बागांचे सौदर्य वाढवितातच पण लोकांना आकर्षित करून घेण्यातही यशस्वी ठरतात असा अनुभव आहे.

nall
या नळांचे वैशिष्ठ म्हणजे ते कोणत्याही पाईपशिवायच हवेत लटकलेले असतात व त्यातून सतत पाणी पडत असते. हे पाणी कधीच संपत नाही व कंटेनरने पाणी भरतानाही कधी दिसत नाही. या अद्भूत नळांसाठी अगदी साधी ट्रिक वापरलेली असते. काचेचा एक पारदर्शी पाईप पाण्याच्या मोटरशी जोडलेला असतो व त्याचे दुसरे टोक नळाला जोडलेले असते. हा नळ त्या पाईपवरच असल्याने मोटर सुरू केली की पाणी या पाईपातून नळापाशी येते व नळाला धडकून पुन्हा खाली पडते. यात पाणी संपण्याचा प्रश्नही येत नाही व पाणी भरण्यासाठी कंटेनरही ठेवावा लागत नाही.

Leave a Comment