सुंदर पिचाई कुटुंबासह सुटीसाठी राजस्थानात

pichai
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई त्यांची पत्नी व दोन मुलांसह नाताळच्या सुटीसाठी राजस्थानात आले असून रविवारी ते जयपूर विमानतळावर उतरलेले पाहिले गेले. अर्थात पिचाई यांची ही सुटी अगदी खासगी स्वरूपाची असल्याने विमानतळावरील मिडीयाला केवळ हात हलवून पिचाई यांनी हॉटेलकडे प्रयाण केले. ते ज्या रामबाग पॅलेस हॉटेलमध्ये उतरले आहेत त्यांनीही पिचाई यांच्या कार्यक्रमाविषयी गुप्तता पाळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पिचाई राजस्थानातील कही शहरे पाहणार आहेत. विशेष म्हणजे पिचाई यांची पत्नी अंजली ही कोटा, राजस्थान येथील आहे.

आयआयटी खरगपूर येथून पदवी घेतलेले सुंदर व अंजली यांचा प्रेमविवाह आहे. दोघेही एकाच काळात या संस्थेत शिक्षण घेत होते व गुगलवर सुंदर आज या पदावर पोहोचण्यात अंजली यांचे योगदानही मोठे आहे. कारण २०११ मध्ये सुंदर यांना जेव्हा टिवटर कडून ऑफर आली होती तेव्हा गुगल न सोडण्याचा सल्ला अंजली यांनी दिला होता.यावेळी गुगलने पिचाई यांना गुगल न सोडण्यासाठी ३०५ कोटी रूपये दिले होते.

Leave a Comment