बालाजीच्या दर्शनासाठी घ्यावा लागणार ‘आधार’

tirupati-balaji
तिरुपती (आंध्र प्रदेश): आधार कार्ड आता वेगवेगळ्या गोष्टींसाठी आवश्यक झाल्याचे आपणा सर्वांनाच माहिती आहे. आधार कार्ड अनेक सरकारी कामांसाठी बंधनकारक आहे. पण आता यासोबतच आधार कार्ड हे मंदिरात दर्शनासाठीही बंधनकारक करण्यात आले आहे. आता प्रसिद्ध तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे.

बालाजी व्यंकटेश मंदिर प्रशासनाने देव दर्शनासाठी आधारकार्ड सक्तीचे करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता यापुढे तिरूपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. तिरुपती बालाजी मंदिरातील सोयी-सुविधांचा भाविकांकडून गैरवापर होत असल्याचे मंदिर प्रशासनाच्या निदर्शनास आले आणि त्यानंतर आधार कार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले.

आधार कार्ड ज्या भाविकांकडे नसेल, त्यांना तिरुपती बालाजीचे फक्त मुखरदर्शन घेता येणार आहे. गाभाऱ्यात प्रवेश करायचा असल्यास आणि प्रसाद हवा असल्यास आधारकार्ड सोबत ठेवावे लागेल. अगदीच काही अपवादात्मक कारण असेल, तर आधारकार्ड दाखवण्याला सूट देण्यात येईल. मात्र, तेव्हाही पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र दाखवून दर्शन घेता येणार आहे.

Leave a Comment