आयसीआयसीआयचे इझी पे मोबाईल अॅप

easypay
आयसीआयसीआय बँकेने व्यावयासिकांसाठी सर्व प्रकारची देणी देऊ शकेल असे मोबाईल अॅप इझी पे या नावाने सादर केले आहे. या अॅपमध्ये डिजिटल वॉलेट, यूपीआय, क्यूआर कोड सह डेबिट व क्रेडीट कार्ड पेमेंट सुविधा मिळणार आहे. अनेक युजर्सना एकाच अकौंटशी कनेक्ट करण्याची सुविधाही यात दिली गेली आहे. कॅश ऑन डिलीव्हरी मोडमध्ये होणारी पेमेंट करण्यासाठीही त्याचा वापर होऊ शकणार आहे.

आयसीआयसीआयचे कार्यकारी संचालक अनुप बागची या संदर्भात म्हणाले की या अॅपद्वारे दोन महिन्यात दोन लाख नवीन व्यावसायिकांना जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे. यापूर्वी एचडीएफसी, एसबीआय, अॅक्सिस बँक यांनीही स्वतःची अॅप लाँच केली आहेत मात्र सर्व तर्हे्ची कार्ड पेमेंट स्विकारणारे हे देशातले पहिलेच अॅप आहे. नोटबंदी नंतर पर्यायी पेमेंट सेवेसाठीची मागणी वाढली असल्याने या अॅपचा लाभ घेण्यास व्यावसायिक नक्कीच प्राधान्य देतील असा विश्वास वाटतो.

Leave a Comment