६६ वर्षाच्या पक्षिणीने घातले अंडे

wisdom
जगातल्या ज्ञात असलेल्या ६६ वयाच्या एका पक्षिणीने अंडे घातल्याची घटना हवाई द्विपसमुहातील मिडवे अॅटॉल नॅशनल वाईल्डलाईफ रिफ्यूजी केंद्रावर घडली आहे. या वयात पिलांना जन्म देणारी ही पहिेलीच पक्षीण आहे. पक्षी केंद्र अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार हे केंद्र लेसान अल्बस्ट्राॅम नावाच्या पक्ष्यांचे निवासस्थळ आहे. याच पक्ष्याला विज्डम किंवा समुद्री चिमणी या नावानेही ओळखले जाते.

pakshi
हे पक्षी प्रवासी पक्षी आहेत व मिडवे अॅटोल हे त्यांचे जगातील सर्वात मोठे निवासस्थळ आहे. ज्या पक्षिणीने अंडे घातले आहे, तिच्या पायात १९५६ साली बोयोलॉजिस्ट चँडलर रॉबिन्स यांनी अॅल्युमिनियमची रिंग ओळखीसाठी घातली होती. रॉबिन्स सध्या ९३ वर्षांचे आहेत. वास्तविक या जातीच्या पक्ष्यांचे आयुष्य १२ ते ४० वर्षांपर्यंत असते असे आढळले आहे मात्र ही पक्षीण ६६ वर्षांची आहे. गेले वर्षभर ती जे घरटे तिच्या जोडीदाराबरोबर वापरत होती तेथेच तिने हे अंडे घातले आहे. २००६ मध्येही तिने ९ अंडी घातली होती.

हा पक्षी आकराने मोठा, पांढर्‍या शुभ्र छातीचा व काळ्याभोर पंखांचा असतो. या पक्ष्यांचा बहुतेक काळ हवेतच जातो कारण ते अन्नाच्या शोधात सतत प्रवास करत असतात. अंडे दिलेल्या पक्षिणीने आत्तापर्यंत तिच्या आयुष्यात ३० लाख मैलांचा प्रवास केला असावा असाही अंदाज पक्षी तज्ञ व्यक्त करत आहेत.

Leave a Comment