१०० एमबीपीएस इंटरनेट स्पीड देणार एअरटेल!

airte
मुंबई – अहमदाबादमध्ये आपल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान व्ही-फायबरचा भारताच्या दूरसंचार क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी भारती एअरटेलने प्रारंभ केला असून सध्या शहरात असणा-या ग्राहकांना या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने १०० एमबीपीएस वेगाने इंटरनेट वापरण्याची सेवा मिळणार आहे. व्हेक्टोराझेशनवर व्ही फायबर हे तंत्रज्ञान आधारित आहे. या तंत्रज्ञानात ब्रॉडबॅन्ड धारकांना अतिवेगवान डेटा, एचडी व्हिडिओ स्ट्रीमिंग आणि अपलोड एकाच वेळी अनेक उपकरणांवर करण्याची सोय आहे. या सेवेनुसार नवीन ग्राहकांना तीन महिन्यासाठी अमर्यादित डेटा मिळणार असून त्याची किंमत ९९९ रुपये आहे. सध्याच्या इंटरनेट वेगापेक्षा व्ही फायबर हे भविष्यातील इंटरनेट वापरण्याची सेवा असणार आहे. कंपनीच्या सध्याच्या ग्राहकांनाही या सेवेचा लाभ घेता येणार आहे. लवकरच अनेक शहरात ही सेवा सुरु करण्यात येईल.

Leave a Comment