मार्चपर्यंत १० कोटी ग्राहकांपर्यंत पोहचणार जिओ

jio
मुंबई – मार्च २०१७पर्यंत मोफत व्हॉईस आणि डेटा पुरविण्यात आल्याने रिलायन्स इन्फोकॉमच्या ग्राहक संख्येत १० कोटीपर्यंतचा आकडा पोहोचू शकते. मात्र ग्राहकांकडून रिलायन्स जिओ शुल्क वसूली करण्यास सुरुवात करणार आहे, त्यावेळी ग्राहकांच्या संख्येत घट होईल असे फिच रेटिंगचे नितीन सोनी यांनी म्हटले. मार्च महिन्यानंतर रिलायन्स जिओ ग्राहकांना मोफत डेटा देण्याची शक्यता कमी आहे. सध्या कंपनीचे ग्राहक ५.२ कोटी ते ५.५ कोटी दरम्यान आहेत. आणि मार्चपर्यंत यांची संख्या वाढत १० कोटीवर जाण्याची शक्यता आहे. मात्र सध्या ही सेवा मोफत देण्यात येत असल्याने कंपनीचे ग्राहक मोठय़ा प्रमाणात वाढत आहेत. एअरटेल आणि व्होडाफोन यांचे ग्राहकसुद्धा मोफत डेटासाठी रिलायन्स जिओचा वापर करत आहेत. कंपनीकडून शुल्क वसुली करण्यास प्रारंभ झाल्यानंतर ग्राहक संख्येत ५ ते १० टक्के घट होण्याची शक्यता आहे, असे त्यांनी म्हटले.

Leave a Comment