आता ‘आधार’द्वारे करा ‘कार्डलेस पेमेंट’

aadhar-card
नवी दिल्ली: ‘कॅशलेस’ पाठोपाठ कार्डलेस व्यवहार यंत्रणा निर्माण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सोमवारपासून केवळ आधार क्रमांक सांगून कोणत्याही व्यवहाराचे पैसे चुकते करणे शक्य होणार असून त्यासाठी आपला आधार क्रमांक बँक खात्याशी ;जोडलेला असणे आवश्यक आहे.

कोणतेही डेबिट, क्रेडिट कार्ड अथवा रोकड ना देता ‘आधार’च्या आधारे या यंत्रणेनुसार आपल्या ‘आधार’शी जोडलेल्या खात्यातून आपले पैसे वळते केले जाणार आहेत. त्यासाठी दुकानदारांकडे स्मार्ट फोन आणि त्यामध्ये आधार पेमेंट ऍप डाऊनलोड केले असणे आवश्यक आहे. तसेच २ हजार रुपये किंमतीचे बोटांचे ठसे तपासणारे यंत्र दुकसानदारांजवळ असणेही गरजेचे आहे. आपण आपला आधार क्रमांक सांगितल्यानंतर दुकानदार बोटाचे ठसे आधाराशी जुळवून घेईल आणि आपल्या खात्यातून पैसे दुकानदाराच्या खात्यात जमा केले जातील.

अर्थातच या पद्धतीने व्यवहार करताना बोटांचे ठसे आवश्यक असल्याने केवळ स्वतः:च्याच आधार क्रमांकावर खरेदी करता येणार आहे. ख्रिसमसचे औचित्य साधून सुरू होणाऱ्या या यंत्रणेमुळे कार्डांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होणे शक्य आहे. देशात ४० कोटी आधार क्रमांक बँक खात्यांशी जोडलेली असून मार्च २०१७ पर्यंत सर्व आधार क्रमांक बँक खात्यांशी जोडण्याचे उद्दीष्ट असल्याचे ‘यूआयडीएआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भूषण पांडे यांनी सांगितले. ही योजना ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाही; त्यांच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल; असा दावाही त्यांनी केला.

Leave a Comment