..तर रेल्वेतील जनरल डब्बे देखील होतील एसी

railway
नवी दिल्ली – रेल्वे मंत्रालय देशभरातील रेल्वे कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या सूचनांमधून ३६ प्रमुख सूचनांची अमंलबजावणी करणार आहे. यातील प्रमुख सूचना स्लीपर आणि जनरल डब्ब्यांना वातानुकूलित बनवण्याची आहे. आणखी एक प्रमुख शिफारस रेल्वे भाडे आणि महागाई जोडून आहे.

रेल्वे मंत्रालयाने तब्बल साडे चौदा लाख कर्मचाऱ्यांकडून रेल्वेतील सुधारणाबाबत सूचना मागवल्या होत्या. त्याच्या उत्तरादखल एक लाख ३६ हजार सुचना प्राप्त झाल्या आहेत. त्यातील ३६ सूचना या लागू करण्याजोगे आहेत. यातील महत्वपूर्ण सूचना प्रवाशांच्या सुखकारक प्रवासा संबंधीत आहे. त्याचबरोबर एक सूचना स्लीपर आणि जनरल डब्बे वातानुकुलीत करण्यासंबंधीत आहे. दरम्यान रेल्वे बोर्डाच्या काही सदस्यांचे म्हणणे आहे की यामुळे डब्ब्यांच्या निर्मितीसोबत कार्य खर्चात वाढ होईल.

याबाबतीत राजकीय नेतृत्व थोडा वेगळा विचार करत आहे. ते गरीबांना योग्य सुविधांचा हक्क आहे असा तर्क देऊन याला पुढे वाढवू इच्छित आहे. जेव्हा सुविधा वाढतील तेव्हा गरीब प्रवासी थोडे अतिरिक्त भाडे देण्यास मागे पाहणार नाही.

Leave a Comment