एचटीसीचा ८ जीबी रॅमचा एक्स ११ लवकरच येणार

htcx11
पॉवरफुल रॅमचा स्मार्टफोन सर्वप्रथम आणण्याची संधी एसटीसीने साधली असून त्यांचा अत्यंत आकर्षक लूकचा एक्स ११ हा नवा स्मार्टफोन जानेवारी २०१७ मध्ये लाँच होत आहे. एचटीसीच्या या फ्लॅगशीप मिडरेंज स्मार्टफोनसाठी ८ जीबी रॅम दिली गेली आहे. तसेच स्नॅपड्रॅगन ८३५ प्रो अॅड्रेनो ५४० ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिटमुळे त्याचा परफार्मन्स उत्तम राहील. ८ जीबी रॅममुळे हा फोन हँग होणार नाही असा दावा कंपनीने केला आहे.

या फोनचे फिचर्स उत्तम दर्जाचे आहेत. ५.५ इंची क्यूएचडी डिस्प्ले स्क्रीन, अँड्राईड नगेट ७.० वर एचटीसीच्या सेन्स ८ युजर इंटरफेसवर तो काम करेल. फोनला तीन कॅमेरे आहेत. त्यात १२ एमपीचे दोन रियर कॅमेरे व ८ एमपीचा सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे. फोनची इंटरनल मेमरी २५६ जीबीची आहे व त्याला ३७०० एमएएच बॅटरी आहे. फोनची किंमत ६५१ डॉलर्स इतकी आहे.

Leave a Comment