झुकेरबर्गच्या लेकीची काळजी घेणार रोबो

jarvis
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग याने घरातली सर्व कामे करणारा व त्याच्या मुलीची काळजी घेणारा मोबाईल रोबो तयार केल्याचे पोस्ट टाकले आहे. मार्क म्हणतो, हा रोबो घराचे दार उघडणे, लाईट, टिव्ही ऑफ ऑन करणे या सारखी घरातली सगळी कामे करेल शिवाय माझ्या लेकीची काळजीही घेईल. हा रोबो म्हणजे एक अॅप असून त्याचे नामकरण जार्विस असे केले गेले आहे. मार्कने त्याची झलक ग्राफिक्सच्या मदतीने दाखविली असून हा रोबो आयर्नमॅन या कॅरेक्टरवरून प्रेरणा घेऊन बनविल्याचे सांगितले आहे.

मार्कच्या म्हणण्यानुसार जार्विस रोबो घरातले एसी, टिव्ही व अन्य इलेक्ट्राॅनिक उपकरणे माणसासारखीच कंट्रोल करू शकतो. दोन प्रकारे हे तंत्रज्ञान काम करते. त्यासाठी सर्व इलेक्ट्राॅनिक व इलेक्ट्रीकल डिव्हायसेस कनेक्टेड ठेवावी लागतात. जे काम करायचे त्या प्रत्येक कामाची वेळ रोबोत सेट करायची किंवा बोलून त्याला कमांड द्यायची. त्यासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे. मार्क सांगतो माझी लेक मॅक्सची काळजीही तो घेतो. तिला इलेक्ट्राॅनिक्स खेळण्यांशी खेळायचे असेल तर तो स्विच ऑन किंवा ऑफ करून देतो तसेच ओव्हनमध्ये दूध गरम करणे व घरात कोणी पाहुणे आले तर त्यांची माहिती अथवा सूचना घरातल्या माणसांना ऑडिओ नोटिफिकेशनच्या सहाय्याने देणे हे कामही तो करतो.

Leave a Comment