स्मार्टफोन वेगाने चार्ज करणारी मॅग्नेटिक केबल

cable
सोशल मिडियावर सध्या स्मार्टफोन चार्ज करणार्‍या केबलच्या एका व्हिडीओने धुमाकुळ घातला आहे. मॅग्नेटच्या मदतीने काम करणारी ही केबल स्मार्टफोन वेगाने चार्ज करतेच पण स्मार्टफोनच्या संपर्कात आल्याबरोबर ती आपोआप कनेक्ट होते व फोन चार्ज केला जातो. मॅग्नेटिक केबल नेक्स्ट जनरेशन अशी ओळख निर्माण झालेल्या या केबलला अँड्राईड व आयफोन साठी वेगळे कनेक्टर दिले गेले आहेत.

या केबलला २.४ अॅपियरचा सपोर्ट दिला गेला आहे व त्यामुळे फोन वेगाने चार्ज होतो. या केबलच्या ३० हजार टेस्ट घेतल्याचा दावा कंपनीने केला आहे. ऑनलाईन स्टोअर्समध्ये ही १ मीटर लांबीची केबल १०८४ रूपयांना रोझ, रेाझ गोल्ड व सिल्व्हर अशा तीन रंगात उपलब्ध आहे. या केबलमुळे वायर ओढली जाण्याचा धोका राहात नाही तसेच चार्जिंग सुरू असताना फोन केबलपासून सुटून खाली पडण्याचा धोकाही नाही. ही केबल १ सेकंदात फोनला जोडली जाते.

Leave a Comment