सरकारने उठवले बँक खात्यामध्ये रक्कम भरण्यावरील निर्बंध

rbi
नवी दिल्ली – बँकेत पैसे जमा करण्यावर यापूर्वी लादण्यात आलेले निर्बंध रिझर्व्ह बँकेकडून बुधवारी मागे घेण्यात आले असून सरकारने राजपत्रित सूचना १७ डिसेंबरला जारी करून जुन्या ५०० व एक हजाराच्या नोटांमधील ५ हजारांपेक्षा अधिक रक्कम ३० डिसेंबपर्यंत एकदाच बँकेत भरता येणार, असे आदेश दिले होते. तसेच ही रक्कम यापूर्वी का भरता येऊ शकली नाही याचे स्पष्टीकरणही खातेधारकांकडून मागविले होते.

सरकारने हा निर्णय बँकांमधील रांगा कमी करण्यासाठी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले होते. मात्र, हा आदेश जारी करण्यात आल्यापासून याबाबत अनेक संभ्रम होते. तसेच या आदेशावर मोठ्याप्रमाणावर टीकाही सुरू होती. त्यामुळे आज नवी सूचना जारी करून हे दोन्ही आदेश रिझर्व्ह बँकेने मागे घेतले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना आपल्या बँक खात्यात ३० डिसेंबरपर्यंत जुन्या नोटांच्या स्वरूपात पाच हजारांपेक्षा जास्त रक्कम जमा करता येईल. तसेच ही रक्कम जमा करताना त्यांना बँक अधिकाऱ्यांना कोणतेही स्पष्टीकरणही द्यावे लागणार नाही. त्यामुळे आता चलनटंचाईच्या वणव्यात होरपळत असलेल्या ग्राहकांना काहीप्रमाणात दिलासा मिळालेला आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेने आपला निर्णय अशाप्रकारे मागे घेतल्याने सरकार अविचारीपणे निर्णय घेत सुटल्याचा विरोधकांचा दावा खरा ठरण्याची शक्यता आहे.

Leave a Comment