तरूणाईत पुन्हा एकदा बेलबॉटमची क्रेझ

belbottom
बॉलीवूडमध्ये सध्या कोणता ट्रेंड आहे यावर फॅशनप्रेमी तरूणाईची स्टाईल ठरत असते. सध्या बॉलीवूडने ७० च्या दशकात अमाप लोकप्रियता मिळविलेल्या बेलबॉटम्सना आपलेसे केले असून हा ट्रेंड फॅशनजगतात चांगलाच लोकप्रिय होत आहे. यात मुलांच्या तुलनेत मुलींकडून बेलबॉटमला अधिक पसंती मिळताना दिसते आहे.

शहरांमधून बेलबॉटम वापराचे अनेक प्रयोग होताना दिसत आहेत. वापरायला सोपी, आरामदायी बेलबॉटमची मागणी आजकाल खूपच वाढली असून ती पार्टी, ऑफिस, शॉपिंग अशी कुठेही फिट दिसते व तिच्या वापराला दिवस, रात्र, दुपार कुठलीही वेळ येाग्य असल्याचे युवा वर्गाचे म्हणणे आहे. बेलबॉटम जिन्सवर क्रॉप टॉप अथवा प्लेन टॉपवर मल्टीकलर जिन्स अशी स्टाईल सध्या चलनात आहे. बेलबॉटम डंगरींनाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यावर फंकी हॅट आणखीनच वेगळा लूक देते.

खालच्या बाजूला रूंद असल्याने या पँटवर चंकी हायहिल्स विशेष शेाभतात. सध्या मात्र व्हाईट स्नीकर्स आणि टेनिस शूज अधिक लोकप्रिय आहेत. १८१३ साली यूएस नेव्हीने सोल्जर्ससाठी बेलबॉटमचा प्रथम वापर केला होता. कॅनव्हास हॅटसह बेलबॉटम वापरण्याची स्टाईल १९७० च्या दरम्यान फारच फेमस ठरली होती. हरे रामा हरे कृष्णा चित्रपटात झीनत अमानने वापरलेल्या बेलबॉटम जगभरात लोकप्रिय ठरल्या होत्या.

Leave a Comment