आता रेल्वे स्टेशनदेखील लग्नासाठी मिळणार भाड्याने

jaipur-station
आपले आयस्रोत वाढविण्यासाठी आता रेल्वे कमी वर्दळ असलेले रेल्वे स्टेशन भाड्याने देणार आहे. यासाठी त्या स्टेशनची निवड करण्यात येईल ज्या स्टेशनवर दिवसभरात एखाद-दुसरी गाडी येत असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबाबतचा सल्ला एका कार्यक्रमादरम्यान दिला होता. मोदींनी ज्याठिकाणी रेल्वे आणि प्रवाशांची वर्दळ तुरळक आहे. त्याठिकाणचा वापर लोकोपयोगासाठी वापरण्यात यावा. देशभरात ८२०० स्टेशन आहेत. त्यातील जवळपास ३०० पेक्षा जास्त स्टेशन फ्लॅग श्रेणीचे आहेत. जयपूर विभागात १२१ स्टेशन आहेत, त्यातील २२ स्टेशन फ्लॅग श्रेणीचे आहेत. त्यातील २७ स्टेशन रेल्वे भाड्याने देणार आहे. ही स्टेशन ग्रामीण भागात आहेत. ही स्टेशन भाड्याने दिल्याने रेल्वेचा आर्थिक फायदा होईल.

Leave a Comment