व्हॅटिकन सिटीचा आकार शिवलिंगाचा

vetican
जगात ईश्वर आहे का नाही हा न संपणारा वाद आहे. त्यासंदर्भात प्रत्येक व्यक्तीची धारणाही वेगवेगळी आहे. कांहीच्या मते ईश्वराचे वास्तव्य मंदिरात असते तर कांहीना ईश्वर चराचरात आहे असा विश्वास वाटतो. एकंदरीत ईश्वर आहे याचे जसे पुरावे देता येत नाहीत तसेच ईश्वर नाही हेही ठामपणे सिद्ध करता येत नाही. या पार्श्वभूमीवर कॅथोलिक ख्रिश्चन लोकांची काशी म्हणजेच इटलीच्या रोममधील स्वतंत्र देश व्हॅटिकन सिटी या शहराचा आकार शिवलिंगाप्रमाणे असल्याचे दिसते व ही खरोखरच आश्चर्याची बाब म्हटली पाहिजे.

भारतीय इतिहासकार पी.एन. ओक यांनी या संदर्भात केलेले विश्लेषण या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आकाशातून तुम्ही व्हॅटिकन सिटीचे निरीक्षण केले तर हे शहर शिवलिंगाच्या आकारात वसविले गेल्याचे स्पष्ट दिसून येते. अगदी लक्ष देऊन पाहिलेत तर शिवाच्या माथ्यावर असणारे त्रिपुंड म्हणजे माथ्यावरच्या तीन लायनीही स्पष्टपणे दिसतील. त्याच्या म्हणण्यानुसार या शहराचे मूळ नांव वाटिका असे होते व त्यावरूनच व्हॅटिकन असे नांव आले असावे. वाटिका या संस्कृत शब्दाचा अर्थ वैदिक संस्कृतिक केंद्र असा आहे.

ख्रिश्चन धर्म येण्याअगोदर हे हिदूंचे धार्मिक केंद्र असावे असाही कयास ओक करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार पुरातत्त्व विभागाने या शहरात केलेल्या उत्खननात शिवलिंग सापडले होते व हे शिवलिंग आजही या शहराच्या ग्रेगोरियन संग्रहालयात पाहायला मिळते. ओक यांनी आग्रयातील ताजमहाल हेही पूर्वी हिंदू मंदिर होते व त्याचे नांव तेजोमहाल असे होते असाही दावा केला आहे.

Leave a Comment