फेब्रुवारी २०१७ पर्यंत कायम राहणार चलनकल्लोळ!

note1
नवी दिल्ली : सध्या देशात सुरु असलेला चलनकल्लोळ फेब्रुवारी २०१७पर्यंत कायम राहील, असे भाकित भारतीय स्टेट बँकेच्या एका अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. स्टेट बँकेच्या इको रॅप नावाच्या नियतकालीकात हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

डिसेंबर अखेर रद्द झालेल्या जुन्या नोटांच्या किमती पैकी पन्नास टक्के किमतीच्या नोटा बाजारात येतील. तर जानेवारी अखेर रद्द झालेल्या नोटांच्या किमतीपैकी ७५ टक्के किमतीच्या नव्या नोटा चलनात असतील. फेब्रुवारी अखेरीस ७८ ते ८८ टक्के नव्या नोटा चलनात आलेल्या असतील, असे सांगण्यात आहे. नोटा बंदीचा निर्णय लागू झाला त्यावेळी ५००च्या १७ अब्ज १६ लाख ५ हजार नोटा चलनात होत्या. तर १ हजाराच्या सहा अब्ज ८५ लाख ८ हजार नोटा चलनात होत्या. पुन्हा एकदा तेवढ्याच किमतीच्या नोटा बाजारात आणायच्या असतील आणखी दोन महिने लागतील, असा स्टेट बँकेच्या अर्थतज्ज्ञांचे मत आहे.

Leave a Comment