पाकिस्तानातही नोटबंदीचा प्रस्ताव मंजूर

paknote
भारतापाठोपाठ शेजारी पाकिस्तानने त्यांच्या चलनातील ५ हजार रूपयांच्या नोटा बंद करण्याच्या संसदेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सोमवारी पाक संसदेत हा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला. काळा पैसा व भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी मोठ्या नोटा चलनातून रद्द केल्या जाव्यात अशी मागणी पाकिस्तानातील खासदारांनी केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार भारताप्रमाणे या नोटा पाकिस्तान चलनातून एकदम बाद करणार नाही तर टप्प्याटप्प्याने त्या बंद केल्या जातील. यामुळे नागरिकांना बँक खात्यांचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळेल अशीही आशा व्यक्त केली जात आहे. तसेच समांतर अर्थव्यवस्थेला आळा बसून काळा पैसा व भ्रष्टाचार नियंत्रणात आणता येईल असेही सांगितले जात आहे. येत्या ३ ते ५ वर्षात या नोटा चलनातून बाद केल्या जाणार आहेत. कायदा मंत्री जाहिद हमीद यांनी मात्र नोटाबंदीमुळे बाजारावर संकट येईल व नागरिक पाच हजारांच्या नोटांऐवजी विदेशी चलन बाळगतील अशी भीती व्यक्त केली आहे.

Leave a Comment