जानेवारीत भारतात लॉन्च होऊ शकतो रेडमी नोट ४

redmi
मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात शाओमी आपला नवा फ्लॅगशिप ‘रेडमी नोट ४’ स्मार्टफोन भारतात लॉन्च करण्याची शक्यता असून याबाबतचे वृत्त माकटेकब्लॉग या ऑनलाईन ब्लॉगने दिले असून या ब्लॉगच्या दाव्यानुसार, नवा रेडमी नोट ४ स्मार्टफोन जानेवारी २०१७मध्ये लॉन्च होणार आहे. शाओमीचा याआधीचा रेडमी नोट ३ भारतीय बाजारात सर्वात यशस्वी ठरल्यानंतर आता रेडमी नोट ४ कडूनही अपेक्षा वाढल्या आहेत. जानेवारीत स्मार्टफोनचे लॉन्चिंग होण्यासंदर्भात कोणत्याही इव्हेंटची घोषणा अद्याप शाओमी कंपनीकडून करण्यात आलेली नाही.

Leave a Comment