ब्लॅक कॅट कमांडो प्रजासत्ताकदिन संचलनाचे आकर्षण ठरणार

black
दिल्ली- भारताच्या प्रजासत्ताकदिन संचलनाच्या इतिहासात प्रथमच यंदा नॅशनल सिक्युरिटी गार्ड चे पथक सामील होणार आहे. कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाशी यशस्वी मुकाबला करू शकणारे व हाय जॅक ऑपरेशन्ससाठी खास तयार केलेले हे ब्लॅक कमांडो त्यांच्या पूर्ण गणवेशात या संचलनात सामील होतील असे समजते. काळा युनिफॉर्म, विशिष्ट हेल्मेट, कमांडो डॅगर व असॉल्ट रायफल्स एमपी फाईव्ह सह संचलनात सामील होणारे हे कमांडो यंदाच्या प्रजासत्ताकदिनाचे मुख्य आकर्षण ठरतील असेही सांगितले जात आहे.

या संदर्भात केंद्रीय गृह व रक्षा मंत्रालयातील वरीष्ठांची बैठक नुकतीच झाली आहे. त्यानुसार एनएसजी मुख्यालयात तयारीने वेग घेतला आहे.लष्कर व निमलष्करी दलातील कमांडोपैकी ६० कमोंडोंची निवड या पथकासाठी केली जात असून त्यासाठीचे प्राथमिक क्लिअरन्सेस घेतले गेले आहेत. कमांडो स्टाईल फास्ट मार्चपास्टचे हे प्रजासत्ताकदिन संचलनातले पहिलेच संचलन असेल. राजपथावर हे पथक आले की परेडला एक डॅशिग लूक येईल असेही सांगितले जात आहे. एनएसजीची स्थापना १९८४ मध्ये झाली आहे.