२०१७ ‘लेस कॅश’ वर्ष म्हणून जाहीर करा; व्यापाऱ्यांची मागणी

cashless
भारतात रोकडविरहित व्यवहारांना चालना देण्याकरिता वर्ष 2017 ला ‘लेस कॅश’ वर्ष म्हणून जाहीर करावे, अशी मागणी कॉन्फडरेशन ऑफ़ ऑल इंडिया ट्रेडर्स या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. डिजिटल पेमेंटच्या स्वीकारासाठी सरकारच्या वतीने व्यापक अभियान राबवावे, अशी मागणीही व्यापाऱ्यांच्या या शिखर संघटनेने केली आहे.

संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी.भारतिया तसेच राष्ट्रीय महामंत्री प्रवीन खंडेलवाल यांनी रविवारी सांगितले, की त्यांच्या संघटनेने व्यापाऱ्यांमध्ये डिजिटल पेमेंटचा प्रसार करण्याकरिता जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात देशभरात राष्ट्रीय अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हे अभियान 60 दिवस चालेल. या व्यतिरिक्त संपूर्ण देशातील बाजारांमध्ये स्थानिक व्यापारी संघटनांच्या सहकार्याने डिजिटल पेमेंट शिबिरे आयोजित केली जातील. यात व्यापारी आणि अन्य लोकांना डिजिटल पेमेंटच्या पर्यायांची माहिती देऊन त्यांचा अंगीकार करण्यास सांगण्यात येईल.

Leave a Comment