ल्यूसिडची नवी एअर इलेक्ट्रीक कार २०१८ त येणार

lucid
इलेक्ट्रीक कार क्षेत्रात दबदबा असलेल्या टेस्लाला आव्हान देण्यासाठी कॅलिफोर्नियातील कार उत्पादक कंपनी ल्युसिडने जोरदार तयारी केली असून त्यांची पहिली इलेक्ट्रीक कार २०१८ मध्ये सादर केली जाणार आहे. एअर या नावाने येणार्‍या या कारसाठी १०० व १३० किलोवॅट बॅटरी ऑप्शन दिले गेले आहेत.

ही कार दिसायला देखणी व गुणानेही उत्तम असल्याचा कंपनीचा दावा आहे.एकदा चार्ज केल्यानंतर ती ६४३ किमीचा पल्ला गाठू शकते तसेच ० ते ९६ किमीचा वेग ती २.५ सेकंदात घेऊ शकते. कारमध्ये इलेक्ट्रीफिकेशन, ऑटोनॉमस ड्रायव्हिंग, कनेकटीव्हीटी व साईड शेअरिंग या चार एरियाज वर भर दिला गेला आहे. ऑटोनोमस ड्रायव्हिंगसाठी जवळ व दूरच्या अंतरासाठी रडार व कॅमेरे दिले गेले आहेत.तसेच अॅप कारच्या सहाय्याने मोबाईल व्हॉईस कंट्रोल सिस्टीमही वापरता येणार आहे. यामुळे कार फंक्शन्स कंट्रोल व ऑपरेट करणे शक्य होणार आहे. कारला अंतर्गत स्पेस भरपूर दिली गेली आहे. सध्या या कारची किंमत १ लाख डॉलर्स म्हणजे ६७.८४ लाख रूपये असली तरी लवकरच थोड्या कमी किमतीतली म्हणजे ४४.११ लाख रूपये रेंजमधले मॉडेलही कंपनी बाजारात आणणार आहे.