पेपलकडून पेटीएमविरोधात तक्रार दाखल

paypal
नवी दिल्ली – जागतिक डिजिटल पेमेंट्स कंपनी पेपलने पेटीएमने आपल्या लोगोची नक्कल केल्याचा दावा करत कंपनीवर ट्रेडमार्क कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. याबाबत एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार, पेटीएमवरील खटला सिद्ध झाल्यास ट्रेडमार्क उल्लंघन कायद्यांतर्गत कंपनीचा लोगो रद्द होऊन आर्थिक परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. दोन्ही कंपन्यांच्या लोगोमध्ये वापरण्यात आलेल्या दोन रंगांमध्ये साधर्म्य असून पेटीएमने आपले अनुकरण केल्याचा पेपलचा दावा आहे.

पेपल आणि पेटीएमच्या लोगोमध्ये पहिला ‘पे’ हा शब्द गडद निळ्या रंगात असून दुसरा शब्द आकाशी रंग आहे. दोन्ही कंपन्यांच्या ट्रेडमार्कची सुरुवात पे या एका शब्दाने होते. ‘पे’ हा शब्द लोकांच्या अधिक लक्षात राहण्यासारखा असून पेपलशी मिळताजुळता आहे. याशिवाय दोन्ही ट्रेडमार्कमधील अक्षरांची रचना व आकार सारखा आहे, असे पेपलने तक्रारीत म्हटले आहे.

Leave a Comment