पीएफवरील व्याजदरात कपात

epfo
बंगळुरु : कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे निर्णय घेणारी शिखर संस्था म्हणजेच केंद्रीय विश्वस्त मंडळाने व्याज दरात घट केली असून २०१६-१७ साठी ईपीएफओने भविष्य निधी ठेवींवर ८.६५ टक्के व्याजदर जाहीर केला आहे. भविष्य निधीवर गेल्या आर्थिक वर्षात (२०१५-१६) ईपीएफओचे व्याज दर ८.८ टक्के होते. ४ कोटींहून अधिक ईपीएफओच्या शेअरहोल्डर्सची संख्या आहे.

अर्थमंत्रालयाने यापूर्वी २०१५-१६ या आर्थिक वर्षसाठी ईपीएफवरील व्याज दर कमी करुन ८.७ टक्के केले होते. मात्र, कामगार मंत्र्यांच्या नेतृत्त्वातील केंद्रीय विश्वस्त मंडळाने ८.८ टक्के व्याज दराला मंजुरी दिली होती. केंद्र सरकारने आपला निर्णय ट्रेड युनियनच्या विरोधानंतर मागे घेतला होता आणि शेअरहोल्डर्सना ८.८ टक्के व्याज देण्यास सहमती दर्शवली.

Leave a Comment