जगातील पाच सर्वाधिक मौल्यवान नाणी

eagle
जगातील बहुतेक देशांनी चलनाची सुरवात करताना नाणी पाडूनच चलन वापराची सुरवात केली आहे. त्यानंतर कागदी व आता प्लॅस्टीकच्या नोटा चलनात येऊ लागल्या आहेत. विविध देशांनी वेळोवेळी चलनात आणलेली नाणी नंतर चलनातून बाद केली गेली मात्र त्यातील कांही नाणी आजही मूल्यवान समजली जातात.त्यंाचे महत्त्वही अबाधित असते व नाणीसंग्राहक अशी दुर्मिळ नाणी मिळविण्यासाठी जंगजंग पछाडत असतात. अर्थात अशा नाण्यांसाठी मोजावी लागणारी रक्कमही भरभक्कम असते. जगात आज सर्वाधिक मूल्याची जी पाच नाणी मानली जातात त्याची माहिती खास माझा पेपरच्या वाचकांसाठी

१)डबल ईगल कॉईन- जगातील सर्वाधिक मूल्याचे जुने नाणे म्हणून हे कॉईन ओळखले जाते. २० डॉलर किमतीचे हे नाणे १८५० मध्ये पाडले गेले व अमेरिकी इतिहासात ते सर्वाधिक किमतीचे नाणे आहे. आज या नाण्याची किमत २ कोटी डॉलर्स इतकी आहे. कॅलिफोर्नीयात गोल्डन रश सुरू झाला तेव्हा ट्रायल स्वरूपात अशी दोन नाणी पाडली गेली. त्यातील १ आजही अमेरिकेच्या राष्ट्रीय नाणी संग्रहालयात पाहायला मिळते.

२)फ्लोईंग हेअर सिल्व्हर कॉईन – अमेरिकी फेडरल सरकारने १७९४ व ९५ मध्ये डॉलरचे हे नाणे यूएस फेडरल मिंटमध्ये पाडले. त्यात १० टक्के तांबे व ९० टक्के चांदीचे मिश्रण असून जगातील हे दोन नंबरचे मूल्यवान नाणे आहे. २०१३ साली एका नाणेसंग्राहकाने ते १ कोटी डॉलरला खरेदी केले असल्याचे सांगितले जाते.

doublee
३)डबल इगल कॉईन- २० डॉलर मूल्याचे हे नाणे १९३३ साली फ्रँकलीन रूझवेल्ट अध्यक्षपदावर असताना पाडले गेले मात्र ते सर्वसामान्यांसाठी कधीच चलनात आणले गेले नाही. पूर्ण सोन्याचे हे नाणे २०१२ साली ७६ लाख अमेरिकन डॉलर्सना विकले गेले. आजमितीला अशी १३ नाणी उपलब्ध आहेत मात्र कायद्यानुसार त्यातील फक्त एकच खासगी मालकाकडे आहे.

edward
४) सेंट गॉड्स डबल इगल – २० डॉलर किमतीचे हे नाणे १९०७ मधले आहे. हे असे नाणे आहे जे १९०७ ते १९३३ पर्यंत यूएस मिटमध्ये पाडले गेले. अतिशय सुंदर नाण्यातील एक अशी याची कीर्ती आहे व या नाण्याची आजची किंमत आहे ७.६ दशलक्ष डॉलर्स.

५)एडवर्ड थ्री फ्लेारेन काईन-१३४३ डिसेंबर पासून ते जुलै १३३४ या काळात पाडले गेलेले हे नाणे जुलै १३४४ मध्ये जारी केले गेले. २००६ साली या नाण्याला संग्राहकाने ६८ लाख डॉलर्स किंमत मोजली होती. अशी तीनच सोन्याची नाणी पाडली गेली होती. त्यावर राजाची प्रतिमा आहे.

Leave a Comment