वादात सापडली राज्य लोकसेवा आयोगाची नवी जाहिरात

mpsc
मुंबई – राज्य लोकसेवा आयोगाची नवी जाहिरात वादात सापडली असून नुकतीच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त पदाच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, या जाहिरातीत त्रुटी असल्यामुळे शुद्धीपत्रक काढावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेणे केली आहे. या परीक्षेची तारीख दिली नाही. तसेच अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अर्ज करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. असेही आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. लोकसेवा आयोगाचे सचिव प्रदीप कुमार यांनी यावर मनविसेच्या पदाधिकाऱ्यांना या प्रकरणी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे लेखी आश्वासन दिले. या गोंधळामुळे या पदांसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ मिळावी, अशी उमेदवारांची मागणी आहे.

Leave a Comment