
नवी दिल्ली – ई-कॉमर्स क्षेत्रातील अग्रमानांकित कंपनी असलेल्या फ्लिपकार्टने आपल्या आगामी ‘बिग शॉपिंग डे’मध्ये वनप्लस ३ या स्मार्टफोनचा समावेश केला आहे. रविवारपासून सुरु होणाऱ्या या सेलमध्ये वनप्लस ३ची किमत २० हजार रुपये सांगितली गेली आहे.
फ्लिपकार्ट स्वस्तात विकणार वनप्लस ३!
या स्मार्टफोनच्या किमतीवर वनप्लसचे सह-संस्थापकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. दरम्यान ही चायना वनप्लस कंपनी आपला स्मार्टफोन वनप्लस ३ ची विक्री केवळ अॅमेझॉन इंडियाच्या माध्यमातून करते आणि हेच कारण आहे फ्लिपकार्टच्या सेलमध्ये समाविष्ट वनप्लसच्या सह-संस्थापक कार्ल पे यांच्या प्रश्न चिन्हाचे.
कार्ल पे यांनी फ्लिपकार्टचे सह-संस्थापक आणि कार्यकारी चेअरमन सचिन बंसल यांनी ट्वीट केले आहे. त्यांनी फ्लिपकार्टच्या वनप्लस ३च्या जाहिराताचा स्क्रीनशॉट जोडत लिहिले आहे कि साहेब हे काय आहे, आम्ही फक्त अॅमेझॉनशी एक्सक्लूसिव्ह आहोत. पे यांच्या ट्वीटचे फ्लिपकार्ट अथवा सचिन बंसल यांच्याकडून कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. पण अॅमेझॉनवर या फोनची विक्री २७,९९९ रुपयात होत आहे, तर दुसरीकडे फ्लिपकार्टने हा फोन २० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत विक्रीस काढला आहे.
