पेटीएमलाच ६.१५ लाख रुपयांना गंडा; सीबीआयमध्ये तक्रार

paytm
नोटाबंदीनंतर चर्चेत आलेल्या डिजिटल व्यवहारांची प्रमुख कंपनी पेटीएमने 48 ग्राहकांनी 6.15 लाख रुपयांना गंडा घातल्याची तक्रार केली आहे. पेटीएमच्या तक्रारीवरून सीबीआयने प्राथमिक तक्रारही नोंदवून घेतली आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकार, सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय आदेश देत नाही तोपर्यंत सीबीआय अशा प्रकरणांमध्ये लक्ष घालत नाही.

सीबीआयने दिल्लीतील कालकाजी, गोविंदपुरी आणि साकेत येथील 15 लोकांसह पेटीएमची मूळ कंपनी वन97 कम्युनिकेशन्सच्या अनाम अधिकाऱ्यांविरोधात या संबंधात गुन्हा नोंदवला आहे.

पेटीएमचे लीगल मॅनेजर एम. शिवकुमार यांनी या संबंधात तक्रार दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे, की एखाद्या ग्राहकाला मिळालेल्या एखाद्या वस्तूत काही त्रुटी असल्यास कंपनी त्याला पैसे परत करते. शिवाय तो मालही परत मागवून संबंधित व्यापाऱ्याकडे पाठवला जातो. ही सर्व प्रक्रिया कस्टमर केयर एक्झिक्टुटीव्हची टीम करते. अशा तक्रारींकडे लक्ष देण्यासाठी त्यांना खास आयडी आणि पासवर्ड दिले जातात. हीच टीम ग्राहकांना तक्रारींनुसार माल परत करण्याची सोय करते.

‘ग्राहकांना व्यवस्थित माल मिळाल्यानंतरही त्यांनी रिफंड करण्यात आल्याच्या 48 प्रकरणे कंपनीने पकडली आहेत. या सर्व 48 प्रकरणांत मिळून 6.15 लाख रुपयांचा रिफंड देण्यात आला,’ असे या तक्रारीत म्हटले आहे.

Leave a Comment