जुन्या नोटा बँकेत जमा करण्याची राजकीय पक्षांना सूट

note1
नवी दिल्ली : जुन्या नोटा राजकीय पक्षांना बँकेत जमा करता येणार असल्याची माहिती अर्थसचिव अशोक लवासा यांनी दिली आहे. पण जिल्हा सहकारी बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने बंदी घातल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

जिल्हा आणि सहकारी बँकांना काळ्याचे पांढरे होण्याच्या भीतीने जुन्या नोटा स्वीकारण्यास बंदी घालणाऱ्या सरकारने आता राजकीय पक्षांना जुन्या नोटा बँकेत जमा करण्याची मुभा दिली आहे. आयकर कायद्यानुसार राजकीय पक्षांना जुन्या नोटा त्यांच्या बँक खात्यात जमा करता येतील, असे अर्थसचिव अशोक लवासा यांनी स्पष्ट केले आहे.

काळा पैशाबाबात सरकारने कडक पावले उचलली आहेत. आयकर विभाग आणि पोलिसांनी आतापर्यंत देशभरात २९१ ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यात ३१६ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यात ८० कोटी रुपयांच्या नवीन नोटांचा समावेश आहे.

Leave a Comment