काळा पैसा पांढरा करण्यासाठी सरकारची शेवटची संधी

modi
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर लगाम घालण्यासाठी जुन्या ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंदल केल्यानंतर आता आणखीन एक नवे पाऊल सरकारने उचलले आहे. काळा पैसाधारकांना आपल्याकडील काळा पैसा पांढरा करण्याची एक संधी सरकारने दिली आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत शनिवारपासून बेहिशेबी रक्कम जाहीर करता येणार असून ३१ मार्चपर्यंत ही योजना सुरु राहणार आहे.

आयकर सुधारणा विधेयकाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यामुळे या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले असून त्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या कायद्याअंतर्गत पंतप्रधान गरीब कल्याण योजना राबविण्यात येत आहे. यासोबतच काळा पैसाधारकांची माहिती देता यावी यासाठी केंद्र सरकारने आता ईमेल आयडी सुरु केला आहे.

पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत बेहिशेबी रक्कम जाहीर करता येणार आहे. ५० टक्के कर आणि दंड भरावा या योजनेंतर्गत लागणार आहे. ही योजना ३१ मार्चपर्यंत सुरु राहणार आहे. या योजनेत काळा पैसाधारकांना आयकर अधिका-यासमोर घोषणापत्र सादर करावे लागणार आहे. या योजनेच्या काळात काळा पैसा जाहीर करणा-यांची नावे गुप्त ठेवण्यात येणार असुन त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, अशी माहिती केंद्रीय महसूल सचिव हसमुख अढिया यांनी दिली आहे.

पत्रकार परिषदेत महसूल विभागाचे सचिव हसमूख अढिया यांनी माहिती दिली की, काळा पैसाधारकांची माहिती देता यावी सरकारने एक ई मेल आयडी सुरु केला आहे. काळा पैसाधारकांसंदर्भातील माहिती [email protected] या ईमेल आयडीवर देता येणार आहे. काळा पैसाधारक तसेच काळा पैसा पांढरा करणा-यांची माहिती या ईमेल आयडीवर द्यावी असे आवाहनही हसमूख अढिया यांनी केले आहे. ईमेलवर लक्ष ठेवण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले असून माहिती मिळताच संबंधीतांवर तातडीने कारवाई करु असे त्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment