आता बोंबला; पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ

petrol
नवी दिल्ली – पेट्रोलच्या दरात पुन्हा एकदा २.२१ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. तर डिझेलच्या भावात १.७९ रूपयाने वाढ करण्यात आली आहे. हे नवे दर काल मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. पेट्रोलच्या भावात नोटाबंदीनंतर वाढ करण्यात येईल असे बोलले जात होते, त्यानुसार आता ही वाढ झाली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक महिन्याआधी कपात करण्यात आली होती. त्यावेळी पेट्रोलचे दर प्रतिलीटर १ रुपया ४६ पैशांनी, तर डिझेल प्रतिलीटर १ रुपया ५३ पैशांनी स्वस्त करण्यात आले होते. त्यानंतर पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव वाढण्यात आले होते.

कच्च्या तेलाच्या किंमतीतमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत दुप्पटीने वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोलची किंमत ५७. ४३ डॉलर प्रतिपिंपावरुन ६२. ८२ डॉलर प्रतिपिंपापर्यंत पोहोचली होती. तर डिझेलचे दर ५६.७९ डॉलर प्रतिपिंपावरुन ६०.९७ डॉलरवर पोहोचले होते. तेल उत्पादन देशांची संघटना ओपेकनेही आगामी काही महिन्यांसाठी उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment