मुंबई : ८ नोव्हेंबरला चलनातून ५०० आणि १०००च्या नोटा मोदी सरकारने रद्द केल्यानंतर ज्यांच्याकडे या नोटा आहेत, त्यांना त्या बँकेत जमा करण्याची मुदत आता ३० डिसेंबरपर्यंत आहे. लाखो रुपये तुम्ही बँकेत जमा केले असतील तर यापुढे ते पैसे काढण्यासाठी पॅन कार्ड बंधनकारक आहे. पॅन नसेल तर तुम्ही बँकेतील तुमच्या खात्यातून पैसे काढू शकणार नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
पॅन कार्ड असेल तरच मिळतील पैसे !
लाखोची संपत्ती बँक खात्यात जमा करणाऱ्याचे आता काही खेरे नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने ठराविक बँक खात्यांवर कठोर निर्बंध लादले आहेत. २ लाख रुपयांच्यावर बँकेत ठेवी असणाऱ्या खातेधारकांना आरबीआयने पैसे काढण्यासाठी पॅन कार्ड नंबर सक्तीचा केल्यामुळे पॅन नंबर नसेल तर बँकेतून एकही पैसा काढता येणार नाही. यामुळे खातेधारकांना धडकी बसणार आहे.
५ लाखांहून अधिक रक्कम ज्या बँक खात्यात आहे आणि ९ नोव्हेंबर नंतर ज्या खात्यात २ लाखांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे, अशा खातेधारकांवर रिझर्व्ह बँकेने बँकींग व्यवहारासाठी कठोर पावले उचलली आहेत. या खातेधारकांना बँकेतून पैसे काढताना आणि पैसे भरताना पॅन नंबर देणे सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच एखाद्याकडे पॅन कार्ड नसेल त्यांनी फॉर्म नंबर ६० भरणे सक्तीचे करण्यात आले आहे. हे तुम्ही हे केले नाही तर तुम्हाला एकही पैसा बँकेतून काढू शकणार नाहीत. तसे आरबीआयने काढलेल्या अधिसूचनेत स्पष्ट नमूद करण्यात केले आहे.