व्हॉट्सअॅपवरून चुकून पाठवलेला मेसेज करता येणार एडिट

whatsapp
मुंबई – आपण व्हॉट्सअॅपच्या मदतीने मित्र, इतर सहका-यांना किंवा एखाद्या ग्रुपमध्ये एकदम सहजच फोटोग्राफ्स, व्हिडिओ किंवा ऑडिओ मेसेज पाठवतो. त्याचबरोबर व्हॉट्सअॅपच्या मदतीने व्हिडिओ कॉलही करु शकतो. मात्र, याच व्हॉट्सअॅपवर आपल्याकडून कधी-कधी असा काही मेसेज समोरच्या व्यक्तीला पाठवला जातो की, जो पाठविल्यानंतर त्याबद्दल वाईट वाटते किंवा चुकून एखादा मेसेज दुस-याच व्यक्तीला पाठविला जातो. मात्र, आता तुमच्याकडून असे काही झाले तर काळजी करण्याची गरज नाही. कारण, व्हॉट्सअॅप आपल्या युझर्ससाठी एक नवे फिचर लवकरच उपलब्ध करुन देणार आहे.

एखाद्या धनुष्यबाणातील बाणाप्रमाणे व्हॉट्सअॅपवरुन सेंड केलेला मेसेज हा असतो, जो एकदा सुटला की त्याची माघार नसते. म्हणजेच तुम्ही पाठवलेला मेसेज हा अर्धवट किंवा चुकीचा असेल तर त्या पाठवलेल्या मेसेजला तुम्ही थांबवू शकत नाहीत. पण आता काळजी करण्याची गरज नाही. आपल्या युझर्ससाठी व्हॉट्सअॅप नव-नवे फिचर्स उपलब्ध करुन देत असते. त्याचाच एक भाग म्हणून व्हॉट्सअॅप आता लवकरच एक नवे फिचर उपलब्ध करणार आहे. याच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपवर पाठवलेला एखादा मेसेज तुम्ही एडिट करु शकणार आहात.

याबाबत आलेल्या बातम्यांनुसार व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच एक असे फिचर उपलब्ध होणार आहे ज्याच्या सहाय्याने युझर्स सेंड केलेला मेसेज पुन्हा एडिट करु शकणार आहेत. रिव्होक आणि एडिट हे फीचर्स व्हॉट्सअॅपने प्रायोगिक तत्त्वावर अॅड केल्याची माहिती ‘वॅबीटाइन्फो’ (WABetaInfo) या ट्विटर हँडलने दिली आहे. तसेच यूझर्स फक्त नुकतेच पाठवलेले व्हॉट्सअॅप मेसेजही डिलीट करु शकणार आहेत. हे फिचर उपलब्ध करुन देण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, हे फिचर कधीपर्यंत उपलब्ध होईल याची माहिती मिळू शकलेली नाही.

Leave a Comment