सरता डिसेंबर दाखविणार रोमांचक नजारे

comet
चालू वर्षाचा अखेरचा महिना डिसेंबरही आता अंतिम पायरीवर पोहोचत आहे मात्र या वर्षातील अनेक अदभूत खगोलिय नजारे पाहण्याची संधीही नागरिकांना देत आहे. निसर्गाचे हे नजारे प्रेक्षकांच्या अंगावर नक्कीच रोमांच उभे करतील.

सध्या रात्री जेनिमीडस तारकासमुहातून उल्का वर्षाव होत आहे. ७ डिसेंबरपासून होत असलेला हा चमकता वर्षाव १७ डिसेंबरपर्यंत दिसणार आहे मात्र त्यासाठी थोड्या अंधार्‍या जागेत जावे लागेल. २१-२२ डिसेंबर हा वर्षातील छोटा दिवसही अनुभवता येणार आहे. या वर्षातला शेवटचा सुपरमून १४ डिसेबरला दिसला आहेच पण ३१ डिसेंबरला ४५ पी मर्कोस पाज्डुकोवा म्हणजेच होंडा धुमकेतू सुर्याच्या सर्वात जवळ पोहोचणार आहे. जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात तो अधिक चमकदार होत जाईल मात्र दुर्बीणीतूनच त्याला पहावे लागणार आहे.

या धुमकेतूची कक्षा चपटी आहे व त्याला सूर्याभोवतीची एक फेरी पूर्ण करायला ५.२५ वर्षे लागतात. ३ डिसेंबर १९४८ साली या धुमकेतूचा शोध लागला होता.

Leave a Comment