नाशिकमध्ये करा प्लॅस्टिक नोटांची छपाई

note1
नाशिक – प्लॅस्टिक नोटांची छपाईचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यास, प्लॅस्टिक नोटा छापण्यास आपली तयारी असल्याचे पत्र नाशिक करन्सी नोट प्रेसने आरबीआयला दिले असून कामगार संघटनेने परदेशातून प्लॅस्टिक नोटांच्या छपाईला विरोध केला आहे.

नाशिकरोड प्रेसमध्ये प्लॅस्टिक नोटा छापण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध असून येथील प्रेस कामगारही कुशल आणि मेहनती आहेत. केवळ मशिनरी अपग्रेडेशन केल्यास नाशिकमध्ये नव्या प्लॅस्टिक नोटांची छपाई करता येईल, असा दावा प्रेस मजदूर संघटनेचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी केले आहे.

देशात प्लॅस्टिक चलनी नोटा व्यवहारात आणण्याचे काही दिवसापूर्वी केंद्रीय अर्थराज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे प्लॅस्टिक नोटावर चर्चा झडू लागल्या आहे. परदेशातून त्या नोटा आयात केली जाण्याची शक्यता आहे. परंतु या नोटा आयात न करता नाशिकरोड प्रेसला हे काम मिळावे, अशी मागणी प्रेस मजदूर संघाची मागणी आहे. याबाबत त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सन् २०१४ साली प्लॅस्टिक नोटा बनविण्याचा व या नोटा बाहेरच्या देशातून मागविण्याचा प्रश्न चर्चेत आला होता. मजदूर संघाने प्लॅस्टिक नोट आयातीला तेव्हाच आक्षेप घेतला होता.

Leave a Comment