ट्रंप यांच्या आर्थिक सल्लागार समितीत इंद्रा नूयी

indran
भारतीय वंशाच्या व पेप्सिकोच्या सीईओ इंद्रा नूयी यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या आर्थिक सल्लागार समितीत नियुक्ती केल्याचे जाहीर केले गेले आहे. नूयी यांच्याबरोबरच स्पेसएक्स व टेस्लाचे संस्थापक इलोन मस्क व उबरचे सीईओ ट्रेविस कालानिक यांचीही या समितीत निवड केली गेली आहे. विशेष म्हणजे अध्यक्षपद निवडणुक काळात नूयी या हिलरींच्या समर्थक होत्या तर मस्क यांनी ट्रंप कधीच चांगले नेते होऊ शकत नाहीत असे मत व्यक्त केले होते. बुधवारी एका सरकारी पत्रकाद्वारे या निवडी केल्याची घोषणा केली गेली अ्राहे.

राष्ट्रपतीपदावर ट्रंप यांची निवड झाल्यावर इंद्रा नूयी यांनी त्यांच्या मुली, समलैगिक कार्यकर्ते, कामगार व अश्वेत यांच्यामध्ये सुरक्षेविषयी चिंतेचे वातावरण निर्माण झाल्याचे मत व्यक्त केले होते. तर मस्क यांनी ट्रंप यांची व्हाईट हाऊस मध्ये जायची लायकी नाही असे मत व्यक्त केले होते. प्रशासनाने मात्र अमेरिकेत व्यवसाय वातावरण वाढविण्यासाठी खासगी क्षेत्रासह काम करणार असल्याचे व सरकार अमेरिकेत नवीन नोकर्‍या निर्माण करण्यासाठी खासगी क्षेत्राला सवतोपरी मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे.

Leave a Comment