किल्ल्यातील निवासाचे समाधान देणारे नो मॅन लँड फोर्ट रिसॉर्ट

shahihotel
इंग्लंडमध्ये १९ व्या शतकातल्या व्हिक्टोरियन इरामध्ये आपल्याला पोहोचायचे असेल तर नो मॅन लँड फोर्टला भेट द्यायला हवी.समुद्रात वसलेला हा प्राचीन किल्ला आता आलिशान रिसॉर्टमध्ये रूपांतरीत झाला असून येथे जाण्यासाठी हेलिकॉप्टर राईड घेता येते किंवा समुद्राच्या लाटांशी खेळत बोटीनेही जाता येते. या भागातले हे दोन नंबरचे मोठे बेट आहे. हा किल्ला बांधण्यासाठी १८५९ मध्ये रॉयल कमिशनकडून परवानगी घेतली गेली मात्र प्रत्यक्षात तो १८६७ ते १८८० या काळात बांधला गेला आहे. मात्र याचा म्हणावा तसा वापर केला गेला नाही.१९७२ मध्ये येथे डॉक्टर हू चित्रपटाचे शूटिंग केले गेले होते.

noman
२००४ साली या किल्ल्यावरच्या पाण्यात लेजियोनेला हे बॅक्टेरिया आढळले व तेव्हापासून त्याचा वापर बंदच केला गेला त्यानंतर तो प्राणी व पक्ष्यांचे निवासस्थान बनला व २००५ पासून त्याची सतत खरेदी विक्री होत राहिेली. २०१५ मध्ये येथे लग्झरीयस हॉटेल सुरू करण्यात आले. चारी बाजूनी समुद्राने वेढलेले हे हॉटेल अल्पावधीत लोकप्रिय झाले आहे. येथे आलिशान अशा २२ बेडरूम्स असून त्यांचे बांधकाम चार लेव्हलमध्ये आहे. तसेच स्पा, रेस्टॉरंट, लाईट हाऊस, हेलिपॅड अशा उत्तम दर्जाच्या सोयीसुविधाही येथे दिल्या जातात.

येथे नोकरीत असलेल्या कर्मचार्‍यांना त्यांच्या अनेक कामांबरोबर हेलिपॅडवरील सीगल हाकलणे व लेझर टॅग गन्सची चाचणी पास होणे हीही कामे करावी लागतात.

Leave a Comment